गुरुजनांचा आधार म्हणजे आयुष्याची उभारणी

19 Feb 2024 16:55:31

गुरुजनांचा आधार म्हणजे आयुष्याची उभारणी


संस्कार ज्ञान दृष्टी आधार गुरुकृपेने...!
येतो घड्यास सुंदर आकार गुरुकृपेने..!

विद्यार्थी दशेत आपण ज्या संस्थेत शिकतो. ज्या गुरुजनांकडून ज्ञान घेतो, ज्याच्यामुळे आयुष्याला वळण आणि शिस्त मिळते. अशा ज्ञानमंदिराच्या आधारावरच कुठल्याही विद्यार्थ्याचे आयुष्य सुकर होत जाते.
 
मनाच्या घड्याला वळण लागते आणि भविष्यातील सुखाची कवाडे कष्टाच्या माध्यमातून खुली होतात. समाजातील जबाबदार नागरिक म्हणू तो किंवा ती उभी राहते.
 
डॉ. केतकीताई पाटील संचालिका असलेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
 
बारावीपर्यंत घरातील सुरक्षित वातावरणातून विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी गोदावरी फाऊंडेशनमध्ये येतात. घरापासून दूर आल्याने कुणी हळवे झालेले असते, अभ्यासाचे प्रेशर घेऊन कुणी विचारमग्न होते तर कुणाला फॅकल्टीचे प्रेशर किंवा अभ्यासाचा ताण असतो. काही जण अनावश्यक अशा पिअर प्रेशरमध्ये तर काही जण समवयस्कांशी तुलना करत असतात. या सर्व बाबींचा विचार करुन डॉ केतकीताईंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्याचे मुल्यमापन केले जाते. विशेषत: वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शिक्षणाव्यतिरिक्त असलेल्या कौशल्याची नोंद केली जाते. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक प्रगतीसाठी एक तक्ता तयार केला जातो. जेणेकरुन प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष दिले जाईल आणी त्याची मानसिक स्थिती सांभाळली जाईल.
 
 
 
 
विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नाराज होणार नाहीत आणि त्यांना नैराश्य येणार नाही याची काळजी घेतली जाते.
 
मुल्यमापनाचे अहवाल आल्यानंतर प्रत्येकाच्या परिस्थितीनूसार त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मानसोपचार तज्ञ मार्गदर्शन करतात. अशा विद्यार्थ्यांना सर्व मदत केली जाते. त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी प्रयत्न केले जातात. खाण्यापिण्याच्या वेळापत्रकापासून ते अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन केले जाते. यासाठी विविध कृती करवून घेतल्या जातात. यामध्ये मुलांना संध्याकाळी शेतावर चक्कर मारुन येणे आणि आल्यानंतर त्यावर त्यांना काय वाटले हे जाणून घेण्यात येते.
 
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले तर भविष्यातील यशस्वी उद्योजक होण्यापासून त्यांना कुणीही रोखू शकत नाही.
Powered By Sangraha 9.0