महिला समाजाचा महत्वाचा घटक आहेत. डॉ केतकीताई पाटील यांच्या माध्यमातून महिला बचत गट, आर्थिक पाठबळ, पायाभूत घटक, व्यवसायासाठी जागेची उपलब्धता आदींबाबत सहकार्य केले जाते. आशा भगिनी या मोठ्या आधार असून त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
बचत गट हे ग्रामीण भागाचा कणा असून एक सामाजिक-आर्थिक उपक्रम या गटाच्या माध्यमातून राबवले जातात. आपण बचत गटांच्या प्रदर्शनाला नेहमीच पाठींबा देत असतो. बचत गटांच्या अडचणी जाणून घेताना त्यांना आर्थिक पाठबळ,जागेची उपलब्धता आणि इतर पायाभूत घटकांची उपलब्धता करून दिली जाते. महिला बचत गटांना प्रोत्साहान देताना जास्तीत जास्त महिलांना सामावून घेण्याचा आग्रह धरला जातो. आशा भगिनींवर प्रामुख्याने भर दिला जात आहे. कारण कुठल्याही गावातील महिलांना आरोग्याच्या समस्या असतील तर तर त्याबाबतचा त्यांचा पहिला संवाद आशा भागीनिशी बोलतात. त्याची काळजी घेण्याचे काम अशा काम करतात. अशा आशा भगिनींशी होत असतो. आशा भगिनींसाठी दरवर्षी दोनवेळा स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने आपण सर्व आशा भगिनींना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करतो , विविध विषयांवर त्यांच्याशी पूर्ण चर्चा केली जाते. त्यांचे छोटे छोटे विषय ते समजावून घेवून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. या भगिनींचे वर्षभरातील कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी २४ तास कार्यरत असणारे एक पथक नेमण्यात आले असून ते केवळ आणि केवळ आशा भगिनींसाठी कार्यरत आहे. आशा भगिनी या इतरांच्या आरोग्याकडे लक्ष देतात , काळजी घेतात परंतु स्वतःच्या आरोग्याची त्यांनी काळजी घेणे तितकेच महत्वाचे असल्याने त्यांचे वर्षातून दोन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी , रक्त तपासणी आदी गोष्टींवर भर दिला जाणार आहे. काम करताना अनेक अडचणी येत असतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी आशा भगिनी समर्थ असतात परंतु काही बाबतीत त्यांना मार्गदर्शनाची आणि समुपदेशनाची गरज असते ; त्यादृष्टीने मार्गदर्शन आणि समुपदेशनाची सत्रे त्यांच्यासाठी सत्रे घेतली जाणार आहेत. या भगिनींवर संपूर्ण गावातल्या महिला आरोग्य आणि इतर कामांचा व्याप मोठा असतो. काम करत असताना कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आरोग्याबाबत तातडीची गरज लागू शकते अशावेळी त्या व्यक्तीला किंवा रुग्णाला जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा क्लिनिकमध्ये पोहोचवण्यासाठी नेमके काय करायचे याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.