आज जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले तरी माणसाचा मानसिक आरोग्याची अवस्था चिंताजनक आहे. डॉ. केतकीताई पाटील यांनी एक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ता नात्याने या विषयाच्या माध्यमातून संवाद साधला आहे.
मानसिक आजार दिसत नाही आणि दिसला तरी अनेकजण तो आहे हे मान्य करायला तयार नसतात. आज असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे मानसिक आरोग्याचे बळी पडले नाहीत. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण या ओझ्यांखाली दबून गेला आहे. याचा परिणाम नात्यांवर होत असून नात्यांमधील अंतर आणि एकमेकांमधील संवाद कमी होत चालला आहे. अनेक गोष्टींमुळे प्रत्येकजण इतका गुंतून गेला आहे कि आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे देखील समजत नाही. म्हणूनच मानसिक आरोग्य जोपासणे खूप महत्त्वाचे झालेले आहे.
या उद्देशाने १० ऑक्टोबरपासून मानसिक आरोग्य जनजागृती करण्यासाठी डॉ केतकीताई पाटील यांनी एका उपक्रमाची सुरुवात केली असून याद्वारे मानसिक आरोग्य या विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्र घेण्यास सुरुवात केली आहे. डॉ केतकीताई पाटील यांनी याची सुरुवात पोलीस दलापासून केली असून जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकाऱ्यांनी मानसोपचार तज्ञांशी बोलून आपल्या समस्या कोणत्या आहेत त्या जाणून घेतल्या आहेत. ७० ते ८० टक्के लोकांना कोणती नी कोणती समस्या असल्याचे लक्षात आले आहे. डॉ केतकीताई पाटील यांच्या अभ्यासानुसार मानसिक आजार हा त्रास मोठा असून तो हळूहळू वाढत जातो आणि त्याचा स्फोट होतो म्हणून त्याबद्दल जाणीव असणे खूप गरजेचे आहे.
डॉ केतकीताई पाटील यांनी ही जाणीव करून देण्याचा उपक्रम सुरू केला असून त्या यासाठी विविध व्यावसायिकांना भेटत असून त्यावर चर्चा करत आहोत. पोलीस विभागानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. गेल्या काही महिन्यांपासून अनेक आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उंचावणे आवश्यक असल्याने डॉ केतकीताई पाटील यांनी या युवावर्गाला हाती धरले आहे. मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना आपली वस्तुस्थिती सांगणे आवश्यक असून प्रत्येक परिस्थतीत आपण सोबत असल्याचेदेखील दाखवणे गरजेचे आहे. संवाद हे समस्या सोडविण्याचे मोठे माध्यम असून त्याचा चांगला परिणाम होवून याबाबत जागृती होणे गरजेचे आहे यावर डॉ केतकीताई यांचा ठाम विश्वास आहे. मित्रांनी आपल्या इतर मित्रांच्या कौटुंबिक अडचणी किंवा आर्थिक समस्या असतील तर जाणून घेतल्या पाहिजेत. या अनुषंगाने डॉ केतकीताई पाटील यांनी समुपदेशन उपक्रमाला सुरुवात केली आहे.
सर्वांनी हे जाणून घेतले पाहिजे कि प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की अशी एक वेळ येते की आपल्याला अडचणी येतात. त्यामुळे आपली तहान-भूक-झोप हरवून जाते. जीवनातल्या या चढ-उतारांना सगळ्यांनाच आयुष्यात कधी ना कधी सामोरे जावे लागते. याबाबत आपण बोलून मोकळे व्हायला हवे. आपल्या भावना काय आहेत त्या इतरांना सांगितल्या पाहिजेत. याबाबत आपणाला जर बोलायला कोणी उपलब्ध नसेल तर आपण मानसोपचार तज्ञांशी बोलले पाहिजे. डॉ केतीकीताई पाटील यांनी या सर्व गोष्टींना सुरुवात केली असून त्या समुपदेशन कार्याला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवतील असा विश्वास वाटतो.