गावाकडील रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई , पुणे यांसारख्या शहरात जावे लागत होते. आज जळगाव मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक चांगले आणि तज्ञ डॉक्टर्स आणि उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
आज शहरामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अनेक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सदेखील उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षात शस्त्रक्रियांच्या बाबतीत ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी होती. दहा वर्षांपूर्वी असा काळ होता कि अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठी लोक पुणे आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये जायचे. आज परिस्थिती बदलली आहे. आपल्या वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी विभागातील तज्ञ उपलब्ध करून दिले असून जळगावच्या आसपासच्या ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ होत आहे. यापूर्वी ही सुविधा उपब्ध नसायची त्यामुळे लोकांना खर्च करून कुटुंबाबरोबर लांब ; शहराकडे जावे लागत असायचे. आज शहरात उपलब्ध असणाऱ्या सुविधा आज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मोठे मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी लोकांना बाहेरच्या शहरात जावून खर्च करावा लागू नये या उद्देशाने त्यांना तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध करून देण्यात येत आहोत. आरोग्य क्षेत्राबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या बऱ्याच योजना असून जास्तीत जास्त गोष्टी विविध योजनांतर्गत बसवण्याचा प्रयत्न करून दिला जात आहे. या सुविधेमुळे लोकांचा खर्च कमी होत आहे. उपचारासाठी लोकांना शहराकडे जावे लागत नसल्याने आपल्या नातेवाईकांना रुग्णाच्या आरोग्याची विचारपूस आणि काळजी घेण्यासाठी सोयीचे होत आहे. रुग्णाला घरगुती जेवण दिल्यास आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते आणि तीही गोष्ट यामुळे सहज शक्य झाली आहे. याउलट शहरामध्ये गेल्यानंतर राहणे ,खाणे-पिणे या सगळ्या गोष्टींचा खर्च वाढतो. दोन-तीन नातेवाईक राहायला गेले की खर्च आणखी वाढतो. ज्या गोष्टी शहरामध्ये उपलब्ध आहेत त्या आता गावाकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असेल तर बाहेरून तज्ञ बोलवून अशा शस्त्रक्रिया केल्या जातात. या सर्व सुविधांचा फायदा अनेकांना झाला असून विशेषतः ग्रामीण भागातील लोक याबात समाधानी आहेत.